बॉलिवूडची दबंग गर्ल म्हटली जाणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अनेकदा तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत येते. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जवळपास दररोज चाहत्यांना तिचा झकास लुक पाहायला मिळतो. अनेकवेळा अभिनेत्री तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोलही झाली आहे. ती केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या शैलीसाठीही प्रसिद्ध आहे. बॉलीवूड अभिनेते आणि अफवा असलेले लव्हबर्ड सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल या फोटोमध्ये तो दोघे ,सोबत दिसत आहेत. संजय लीला भन्साळी यांची भाची,अभिनेत्री शर्मीन सेगल यांच्या रिसेप्शनमध्ये ते सहभागी झाले होते. सोनाक्षी नेहमीप्रमाणे हिरव्या पारंपारिक पोशाखात सुंदर दिसत होती, तर झहीर डॅपर इंटक्सेडो सूटमध्ये दिसत होता.