अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सध्या तिच्या ‘झिम्मा 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.



रिंकूचा 'झिम्मा-2' हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला आहे.



रिंकू ही विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.



रिंकू ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असते.



रिंकू सोशल मीडियावर तिच्या विविध लूकमधील फोटो शेअर करते.



रिंकूनं नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रिंकूनं तिच्या आई-बाबांनी तिला दिलेल्या गिफ्टचा फोटो शेअर केला आहे.



रिंकूच्या आई-वडिलांनी तिला आयफोन-15 प्रो मॅक्स हा फोन गिफ्ट म्हणून दिला आहे.



रिंकूनं तिच्या नव्या फोनचा फोटो शेअर करुन तिच्या आई-बाबांचे आभार मानले आहेत.



2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटातून रिंकू राजगुरूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील रिंकूच्या अभिनयानं अनेकांचे मन जिंकले.



रिंकूने ‘मेकअप’, ‘कागर’ अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केलं.