क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा होणार आहेत,अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होते अशातच आता विरुष्का बेंगळुरू येथे स्पॉट झाले बेंगळुरू येथील अनुष्का आणि विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्काचे बेबी बंप दिसत आहे,असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. विरुष्काच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का ही विराटसोबत हॉटेलबाहेर फिरताना दिसत आहे. विराटने तिचा हात पकडला आहे,असंही दिसत आहे. अनुष्कानं काळ्या रंगाचा शॉर्ट फ्लेर्ड ड्रेस घातला आहे .ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे विरुष्काच्या या व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनुष्का आणि विराट यांना काही दिवसांपूर्वी मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर पापाराझींनी स्पॉट केले होते