करण जोहरचा लोकप्रिय कार्यक्रम 'कॉफी विथ करण 8' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.



या कार्यक्रमाच्या आगामी भागात बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि आलिया भट्ट हजेरी लावणार आहेत.



'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमासाठी करीना आणि आलियाने महागडा ड्रेस परिधान केला आहे.



दोघीही आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्री असल्या तरी करीना नात्याने आलियाची ननंद आहे.



या कार्यक्रमाच्या आगामी भागाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



प्रोमोमध्ये आलिया आणि करीनाचा फॅशनेबल लूक पाहायला मिळत आहे.



ब्लॅक अॅन्ड व्हाइट मोनोक्रोमॅटिक लूकमध्ये बेबो खूपच सुंदर दिसत होती.



करीना कपूरने घातलेल्या ड्रेसचे किंमत 74 हजार रुपये आहे.



आलिया भट्टने करीना कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना चॉकलेटी रंगाचा शिमरी गाउन परिधान केला होता.



या शिमरी ड्रेसची किंमत 1550 डॉलर म्हणजेच जवळपास 1.28 लाख रुपये आहे.