पनामा पेपर (Panama Papers Leak Case) लीक प्रकरणी बच्चन कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बच्चन कुटुंबीयांची सून ऐश्वर्या राय बच्चन हिला ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं.
अशातच ऐश्वर्या राय ईडीच्या दिल्ली कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिली आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं यासंदर्भात माहिती दिली.
दरम्यान, पनामा पेपर लीक प्रकरणी बच्चन कुटुंबाचंही नाव समोर आलं होतं.
तेव्हा ईडीनं याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचाही गुन्हा नोंदवला होता.
अंमलबजावणी संचालनालयाचे एचआययू या प्रकरणाची चौकशी करत आहे.
2016 मध्ये, यूकेमध्ये पनामा-आधारित लॉ फर्मचे 1.5 कोटी कर कागदपत्र लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती.
भारताबद्दल बोलायचे झाले तर जवळपास 500 जणांची नावे समोर आली आहेत. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश होता.
एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते.