मलायका अरोरा म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. मलायका नेहमची आपल्या क्लासी लूक्सनी सर्वांना भूरळ घालते. मलायका नेहमीच आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो. मलायका अरोरा सध्या तिच्या मूव्हिंग इन विथ मलायका या शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये मलायका वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गुपितं शेअर करत असते. 'मूव्हिंग इन विद मलायका' सध्या सोशल मीडियावरही चर्चेत आहे. मलायका शोमध्ये नेहमीच नवनवीन लूक कॅरी करत असेत. यावेळी मलायका काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसून आली. आपल्या क्लासी लूकमधील ब्लॅक अँड व्हाईट फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (सर्व फोटो : @malaikaaroraofficial/Instagram)