अवतार द वे ऑफ वॉटर म्हणजेच अवतार-2 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अवतार-2 हा चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाले. चित्रपटातील VFX आणि कथा यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 'अवतार द वे ऑफ वॉटर' ने बुधवारी (21 डिसेंबर) सहाव्या दिवशी किती कमाई केली? ते जाणून घेऊया. 'अवतार द वे ऑफ वॉटर' भारतात 3800 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे. ‘अवतार द वे ऑफ वाटर’ या चित्रपटानं बुधवारी 15.25 कोटींची कमाई केली. आता अवातरचे एकूण कलेक्शन 179 कोटी एवढे झाले आहे. लवकरच हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल असं म्हटलं जात आहे. 'अवतार 2' या सिनेमाची निर्मिती 250 मिलियन डॉलर्स म्हणजेच 2000 कोटींमध्ये करण्यात आली आहे. भारतात हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे.