या पार्टीत अभिनेत्री आलिया भट्टदेखील सहभागी झाली होती.



त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने तिला सात दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता.



पण 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित होण्यापूर्वी आलियाने दिल्लीतील गुरुद्वारला भेट दिली.



त्यामुळे होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन केल्याने आलिया भट्ट विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.



परंतु आता मुंबई महानगर पालिकेने आलिया भट्टला मोठा दिलासा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.



सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आलिया भट्टने क्वारंटाइन नियम तोडलेले नाहीत.



आलिया भट्ट काल रात्री चार्टड विमानाने मुंबईत दाखल झाली आहे.



आलिया भट्ट हाय रिस्क रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने तिला सात दिवस होम क्वारंटाईन राहाण्याचा सल्ला दिला होता.



नंतर पाच दिवसांतच आलिया दिल्लीत पोहोचली.



आलियाने एका दिवसाच्या कामासाठी होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन केले. दरम्यान आपण एका दिवसाच्या कामासाठी दिल्लीला जात असून आपला कोविड रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे आलियाने पालिकेला कळवले होते.