BMW ने लॉस वेगास येथे आयोजित कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2023 मध्ये आपली 32 रंग बदलणारी इलेक्ट्रिक कार प्रदर्शित केली
सध्या मॅचिंग आऊटफिट, शूज अशी फॅशन आहे.
पण जर तुम्हाला कपड्यानुसार तुमच्या गाडीचा (Car) रंगही बदलता आला तर...
हे शक्य आहे. बीएमबल्यूने (BMW) रंग बदलणारी कार बनवली आहे.
आघाडीची आणि प्रसिद्ध जर्मन वाहन निर्माता कंपनी बीएमबल्यूने
लॉस वेगास येथे आयोजित कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2023 मध्ये
आपली रंग बदलणारी इलेक्ट्रिक कार प्रदर्शित केली आहे.
विशेष म्हणजे ही कार एक-दोन नाही तर 32 रंग बदलते.
आय-व्हिजन डी ही BMW ची कलर बदलणारी कार आहे.
कंपनीने Less is More या टॅगलाइनसह ही कार सादर केली आहे