भारताचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन

वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

१९६७ ते १९७९ या बारा वर्षांच्या कालावधीत बेदी यांनी ६७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

या ६७ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी २६६ विकेट्स घेतल्या होत्या.

बेदी यांनी १० वन डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करून सात फलंदाजांना माघारी धाडलं होतं.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान फिरकी गोलंदाजांपैकी एक अशी बेदी यांची ओळख होती.

भारताच्या बेदी, चंद्रशेखर, प्रसन्ना आणि वेंकटराघवन या फिरकी चौकडीची एका जमान्यात क्रिकेटविश्वात दहशत होती.

१९६० आणि १९७०च्या दशकात बेदी यांच्या डावखुऱ्या फिरकी आक्रमणासमोर रथीमहारथी फलंदाजांची झालेली पंचाईत क्रिकेटविश्वानं पाहिली आहे.

भारतामध्ये विश्वचषक सुरु असतानाच क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली