मेष : आजच्या दिवसांत तुमचे दीर्घकाळ चाललेले कायदेशीर वाद संपण्याची शक्यता आहे. मालमत्ता, जमी-जुमला खरेदी करण्याची इच्छा देखील पूर्ण होईल.
वृषभ : नफा मिळवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी नियोजन करण्याची वेळ आता आली आहे. कुणाशीही वाद घालू नका, अन्यथा तणाव जाणवेल.
मिथुन : तुमच्या आर्थिक समस्या आज सुटणार आहेत. कुटुंबातील व्यक्तीचे लग्न निश्चित झाल्यामुळे वातावरण शुभ राहील. जबाबदाऱ्या पार पाडण्यात चुकू नका.
कर्क : आजच्या दिवसांत कुणावरही रागवू नका. रागामुळे तुमचे आरोग्य बिघडेल, तणाव देखी वाढेल. कामात निष्काळजीपणे करू नका. व्यापाऱ्यांना नफा होण्याची शक्यता आहे.
सिंह : आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा कठीण जाईल. नोकरीत पदोन्नतीला मुकण्याची सहायता आहे. मात्र, एखाद्याला सरकारी नोकरी देखील मिळू शकते. शांत राहण्याचा प्रयत्न करा.
कन्या : सरकारी खात्यात काम करणाऱ्या लोकांनी आपले काम काळजीपूर्वक करावे. बदलत्या काळानुसार स्वतःला बदला. आज तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ : आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. मात्र, कुणाशीही वाद घालणे टाळा. कामाकडे सकारात्मकतेने पहा.
वृश्चिक : आज तुमच्यासाठी दिवस आनंद आणि उत्साहाचा असेल. मात्र, गर्वाने फुगून बेडकाचा बैल होऊ देऊ नका. व्यवसायात पैसे गुंतवावे लागतील.
धनु : आज तुम्हाला काही कामासाठी थोडीशी धावपळ करावी लागेल. मात्र, कामे सहज पूर्ण होतील. नोकरपशा लोकांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.
मकर : ध्येयावरील लक्ष विचलित होऊ देऊ नका. आज आरोग्याच्याही काही कुरबुरी जाणवतील. सर्व प्रकारे सावध रहा.
कुंभ : आज तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात काही नवीन लोकांशी संपर्क फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांसह कोणत्याही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
मीन : आज खर्च करताना विचार करूनच करा. इतरांना सल्ले देणं टाळा. शारीरिक दुखापत होण्याची शक्यता आहे. व्यवसायात काही लाभाच्या संधी मिळतील.