आयपीएल म्हणजे चौकार, षटकारांचा पाऊस. त्यात अखेरच्या षटकांमध्येतर फलंदाज तुफान खेळी करतात. अखेरच्या षटकात मनोरंजन करण्यात सर्वात अव्वल स्थानी असणाऱ्या फलंदाजामध्ये धोनी अव्वल स्थानी आहे. या यादीत टॉप 5 मध्ये 4 फलंदाज भारतीय आहेत. धोनीने 20 व्या षटकात 51 षटकार आणि 48 चौकार लगावले आहेत. धोनीने गुरुवारी देखील मुंबईविरुद्ध अखेरच्या षटकात 16 धावा करत विजय मिळवून दिला. धोनीने याआधी देखील असे अनेक सामने चेन्नईला जिंकवून दिला आहे. धोनीनंतर पोलार्डचा नंबर. पोलार्डने 33 षटकार आणि 26 चौकार ठोकले आहेत. तिसऱ्या स्थानावर 23 षटकार आणि 18 चौकारांसह भारतीय कर्णधार रोहित शर्मा यादीत चौथ्या स्थानावर हार्दिक पंड्या असून त्याने 16 चौकार 24 षटकार लगावले आहेत. यादीत पाचव्या स्थानावर चेन्नईचा रवींद्र जाडेजा असून त्याने 13 चौकार आणि 25 षटकार लगावले आहेत.