आमना शरीफचा फॅशन सेन्स इतरांपेक्षा खूपच वेगळा आहे. आमना अनेक वेळा तिच्या जबरदस्त फोटोंनी चाहत्यांना भुरळ घाल असते. अलीकडेच आमनाने शराराच्या सेटवरील स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटेमध्ये ती अगदी पंजाबी कुडीसारखी दिसत आहे. आमनाने अबोली रंगाची फुल स्लीव्ह कुर्ती आणि शरारा परिधान केल आहे. आमनाने या ड्रेसवर भरतकाम आणि टॅसल वर्क असलेला पांढरा दुपट्टा घेतला आहे. फाइन ज्वेलरीच्या वॉर्डरोबमध्ये सोनेरी स्टेटमेंट इअररिंग्जमध्ये आमनाचा लूक परिपूर्ण दिसत आहे. या फोटोत तिने कॅमेर्यासाठी अनेक पोझ दिल्या आहेत. या फोटोसाठी आमनाने तिचे केस मोकळे सोडले आहेत. फॅशन स्टायलिस्ट प्रणिता शेट्टीने तिच्या केसांची स्टाईल केली आहे.