बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. 2020 मध्ये ती पती करण सिंग ग्रोव्हरसोबत 'डेंजरस' वेब सिरिजमध्ये दिसली होती. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना बिपाशा म्हणाली की , 'मी आळशी झाले होते आणि गेल्या काही वर्षांपासून काम करत नव्हते. 2022 मध्ये कामावर परतणार आहे. मी काहीतरी मनोरंजक करेन. मला आशा आहे की याची लवकरच एक घोषणा होईल. बिपाशा आता इंडस्ट्रीमध्ये परतण्यासाठी तयार झाली आहे. बिपाशा सांगते, 'आता मी खूप काम करायला पूर्णपणे तयार आहे.