आलिया-रणबीरनंतर लगेचच बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा आणि करणने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे
बिपाशा-करणच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.
बिपाशाने खार येथील हिंदुजा रुग्णालयात एका गोड मुलीला जन्म दिला आहे.
लग्नाच्या सहा वर्षानंतर करण आणि बिपाशा आई-वडील झाले आहेत.
बिपाशा गेल्या काही दिवसांपासून मॅटर्निटी शूटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत होती.
तसेच बिपाशाने बेबी शॉवरचे फोटोदेखील शेअर केले होते
बाळाच्या गोड बातमीने दोघांचेही चाहते आनंदी झाले आहेत
सोशल मीडियावर बिपाशा आणि करणचे फोटो शेअर करत ते आपला आनंद व्यक्त करत आहेत.
वयाच्या 43 व्या वर्षी बिपाशाने एका गोड मुलीला जन्म दिला आहे
धूम 2, फिर हेरा फेरी,नो एन्ट्री, मेरे यार की शादी है या चित्रपटांमध्ये बिपाशानं काम केलं आहे.