जगभरात कोरोनाचे (Coronavirus) संकट वाढतच चालल्याचं पाहायला मिळत आहे. कोविड-19 (Covid19) महामारीमुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे.
दरम्यान, बिल गेट्स (Bill Gates) यांनी भविष्यातील महामारीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
बिल गेट्स यांचा विश्वास आहे की, भविष्यात कोरोना विषाणूपेक्षाही वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे.
गेट्स फाऊंडेशन आणि ब्रिटीश बायोमेडिकल धर्मादाय संस्था वेलकम यांनी मंगळवारी कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात आणि भविष्यातील साथीच्या रोगांच्या तयारीसाठी 150 दशलक्ष डॉलरची देणगी दिली.
ही रक्कम भविष्यात उद्धभवणाऱ्या महामारीची पूर्वतयारी करणाऱ्या CEPI संस्थेला देण्यात आली आहे.
यावेळी बिल गेट्स यांनी भविष्यातील महामारीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
कोरोना महामारीच्या वाढत्या उद्रेकादरम्यान, CEPI ला दान केलेली रक्कम कोविड संसर्गाविरुद्धच्या लढाईसाठी वापरली जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.
यासोबतच भविष्यातील साथीच्या आजारांसाठीही संघटना तयारी करणार आहे.
यासोबतच भविष्यातील साथीच्या आजारांसाठीही संघटना तयारी करणार आहे.