शनिवार (4 फेब्रुवारी) सुंबुल तौकीर खान ही बिग बॉसच्या 16 व्या सिझनमधून आऊट झाली.



एका मुलाखतीमध्ये सुंबुलनं तिचा बिग बॉसमधील प्रवास सांगितला.



मुलाखतीमध्ये सुंबुल म्हणाली, बिग बॉस'मधील माझा प्रवास अप्रतिम होता आणि मला कधीच वाटलं नव्हतं की, मी इथपर्यंत येऊ शकेल.



सुंबुलनं बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.



पोस्टच्या माध्यमातून सुंबुलनं तिच्या कुटुंबाचे, चाहत्यांचे आणि मित्रमैत्रिणींचे आभार मानले.



हा असा प्रवास होता ज्याची मी कधीही कल्पना केली नव्हती. हा आतापर्यंतचा सर्वोत्तम अनुभव ठरला., असं सुंबुलनं पोस्टमध्ये लिहिलं.



पोस्टमध्ये तिनं 'हक से मंडली' असंही लिहिलंय.



मंडली या टीममध्ये सुंबुल, शिव, एससी स्टॅन, निमरीत हे स्पर्धक होते. या टीमला प्रेक्षकांची पसंती मिळत होती.



सुंबुलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच, तिच्या या पोस्टला काही नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे.



बिग बॉस या शोमधील स्पर्धकांमध्ये वाद होत असतात. विकेंडला सलमान खान शोमध्ये येऊन बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांसोबत संवाद साधतो.



Thanks for Reading. UP NEXT

देबिना-गुरमीतने दुसऱ्या मुलीचा चेहरा केला रिव्हिल

View next story