'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम प्रणाली राठोड घराघरात पोहोचली आहे. प्रणालीचा जन्म 15 ऑक्टोबर 1999 रोजी झाला. मॉडेलिंगच्या माध्यमातून प्रणालीने करिअर सुरू केलं. 'प्यार में पहली बार' मालिकेतून तिने अभिनय सुरू केला. प्रणाली मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी 40 हजारांपर्यंत मानधन घेते. प्रणालीची संपत्ती एक कोटी रुपयांपर्यंत आहे. प्रणाली प्रत्येक जाहिरातीसाठी एक लाख रुपये घेते. क्लीन अॅंड क्लिअरच्या जाहिरातींमधून ती दिसली. बॅरिस्टर बाबू मालिकेत तिने निगेटिव्ह भूमिका साकारली. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील तिची अक्षराची भूमिका गाजली.