बॉलिवूडच्या भाईजानची 'बिग बॉस 16'मधून एक्झिट होणार आहे.
'बिग बॉस' हा कार्यक्रम बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या नावाने ओळखला जातो.
गेल्या काही वर्षांपासून भाईजान हिंदी 'बिग बॉस'च्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे.
सलमान सध्या 'बिग बॉस 16'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सलमानने आता 'बिग बॉस 16'मधून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
भाईजान वीकेंडच्या वारमध्ये स्पर्धकांची शाळा घेताना न दिसणार असल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत.
महाअंतिम सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा सलमान खान सांभाळताना दिसणार आहे.
सलमान खान गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस 16'चं सूत्रसंचालन करत होता.
सलमानचा आता बिग बॉसशी असलेला करार संपला आहे.
सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.