बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला 'झुंड' सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

सोलापुरात नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे.

सोलापुरात सिनेमागृहाबाहेर नागराज मंजुळेंचे हाताने रेखाटलेले भलेमोठे पोस्टर लावण्यात आले आहे.

सोलापुरात ज्या सिनेमागृहाबाहेर दिग्दर्शक नागराज मंजुळे सिनेमाचे पोस्टर बघण्यासाठी फिरायचे. आता त्याच सिनेमागृहाबाहेर नागराज मंजुळे यांचे हाताने रेखाटलेले भलेमोठे पोस्टर लावण्यात आले आहे.

सोलापुरातील सुप्रसिद्ध चित्रकार यल्ला-दासी यांनी हे चित्र रेखाटले आहे.

सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच दिग्दर्शकाचे हाताने रेखाटलेले पोस्टर सिनेमागृहाच्या बाहेर लावण्यात आले आहे.

'झुंड' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

'झुंड' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.