ऐश्वर्या राय बच्चनचा 'पोन्नियन सेल्वन' हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. यासोबतच निर्मात्यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूकही रिलीज केला आहे. दिग्दर्शक मनीरत्नम यांचा 'पोन्नियन सेल्वन' हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील कलाकरांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ही माहिती शेअर केली आहे चित्रपटात विक्रम जयम रवी, कार्ती आणि शोभिता धुलिपालादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपट तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडच्या व्यतिरिक्त हिंदीत प्रदर्शित होणार आहे