आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडवर तीन धावांनी रोमहर्षक विजय मिळवला



या सामन्यात वेस्ट इंडिजची फिरकी गोलंदाज अनिसा मोहम्मदने कारकिर्दीतील 300वी विकेट पूर्ण केली



अनिसा महिला क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारी वेस्ट इंडिजची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.



न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात तिने 10 षटकात 60 धावा देऊन दोन विकेट घेतल्या होत्या.



119 धावा करणाऱ्या 23 वर्षीय हेली मॅथ्यूजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.



महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आजही भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या नावावर आहे



झुलनने आतापर्यंत 345 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत तर अनीसा आता 300 क्लबमध्ये पोहोचली आहे