या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यवहारावर तर होतोच आहे. परंतु, भारतीय बाजारपेठेवरही या युद्धाचे पडसाद उमटताना दिसतायत.
याच युद्धाचा परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या किंमतीतही सातत्याने अस्थिरता निर्माण झाली आहे. आज (4 मार्च) रोजी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.
भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात 490 रुपयांनी तर चांदीच्या दरात 50 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे.
यानुसार, सोन्याचा दर 53,000 हजार प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा दर आज 68,600 प्रति किलोवर पोहोचला आहे.
सोने आमि चांदी या दोन्ही धातूंच्या किंमतीत वाढ सुरूच आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.