ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचे 15 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने छाप सोडली. बप्पी लाहिरी हे कोणत्याही कार्यक्रमाला किंवा शोमध्ये वेगवेगळे दागिने घालून उपस्थित राहात होते.

त्यांच्या निधनानंतर त्यांचे दागिने कुठे ठेवले जातील? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला असेल.

नुकताच बप्पी लाहिरी यांच्या मुलाने म्हणजेच बप्पा लाहिरी यांनी बाप्पी दा यांच्या दागिन्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

बप्पा लाहिरी यांनी सांगितले की, बप्पी यांचे दागिने हे एका संग्रालयात ठेवले जाणार आहेत. त्यामुळे आता बप्पी लाहिरी यांचे दागिने त्यांचे चाहते पाहू शकतील.

बप्पी लाहिरी यांच्याकडे सोन्याच्या दागिन्यांबरोबरच शूज, गॉगल आणि घडाळ यांचे देखील कलेक्शन होते.

2014 मधील एका रिपोर्टनुसार, बप्पी लाहिरी यांच्याकडे 754 ग्रॅम सोनं आणि 4.62 किलो चांदी होती. तसेच ते एकूण 20 कोटी रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.