बहुचर्चित 'चंद्रमुखी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

या सिनेमात चंद्रा हे पात्र कोण साकारणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. पण अखेर आज 'चंद्रमुखी'चा चेहरा समोर आला आहे.

'चंद्रमुखी' सिनेमात चंद्रा हे पात्र अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहे.

'चंद्रमुखी' सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकारणात मुरलेला नेता खा. दौलत देशमाने आणि एक लावणी कलावंत असणाऱ्या 'चंद्रा'ची प्रेमकहाणी आहे.

तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आणि राजकारणात मुरलेला ध्येयधुरंदर राजकारणी यांच्यात निर्माण होणारी ओढ प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळणार आहे.

'चंद्रमुखी' हा सिनेमा लेखक विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कांदबरीवर आधारित आहे.

सिनेमाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय - अतुल या दमदार जोडीने 'चंद्रमुखी'ला संगीत दिले आहे.