भेडिया हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.



चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला.



ट्रेलर पाहून आता वरुणच्या या चित्रपटाची तुलना नेटकरी 30 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या राहुल रॉयच्या जुनून या चित्रपटासोबत करत आहेत.



काही युझर्स या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक करत आहेत.



1992 मध्ये रिलीज झालेल्या जुनून या चित्रपटाचं महेश भट्ट यांनी दिग्दर्शन केलं होतं.



वरुण धवन आणि क्रिती सेनन यांच्या भेडियाच्या ट्रेलरवर सोशल मीडियावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.



एका यूजरने ट्वीट करून लिहिले आहे की, भेडियाचा ट्रेलर पाहिल्यानंतर मला राहुल रॉयचा जुनून आठवला.



केआरकेनं भेडीया हा चित्रपट जुनूनची कॉपी आहे, असं ट्वीटमध्ये लिहिलं.



भेडीया चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



25 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.