अभिनेत्री कंगना रनौत ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगना रनौत तिच्या चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.
दरम्यान, बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना एका प्रोजेक्टमध्ये आयकॉनिक सुपरस्टारच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
अभिनेत्री कंगना रनौत 'नटी बिनोदिनी' यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.
अभिनेत्री कंगना रनौतच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट आला आहे. ती लवकरच 'नटी बिनोदिनी' या बायोपिक चित्रपटात दिसणार आहे.
या प्रोजेक्टबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, ‘मी प्रदीप सरकार यांची खूप मोठी फॅन आहे आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे.’
कंगना रनौतने तिचा पुढचा चित्रपट साईन केला आहे. ज्यामध्ये ती प्रसिद्ध अभिनेत्री आणि बंगाली थिएटर आर्टिस्ट बिनोदिनी दासी उर्फ नटी बिनोदिनी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
बिनोदिनी दासी अर्थात नटी बिनोदिनी हे चित्रपटांसह बंगाली थिएटरचे एक मोठे नाव होते.
त्यांनी रंगमंचावर अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या. आपण साकारत असलेल्या पात्रांवर प्रयोग करण्यात त्या माहिर होत्या.
मंचावर चैतन्य महाप्रभूंची भूमिका साकारून बिनोदिनी जगभर प्रसिद्ध झाल्या. रंगमंचावर साकारलेल्या या भूमिकेने बिनोदिनी दासींना नव्या उंचीवर नेले.