आज बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन आलियाला दहा वर्ष झाली.



कधी जनरल नॉलेजमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे आलियाला अनेक वेळा ट्रोलर्सनं ट्रोल केलं.



ट्रोलर्सकडे लक्ष न देता आलियानं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली.



2012 मध्ये रिलीज झालेल्या स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटामधून आलियानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.



आज बॉलिवूडमध्ये आलियानं दहा वर्ष पूर्ण केली आहेत. याच निमित्तानं जाणून घेऊयात आलियाचे प्रेक्षकांची पसंती मिळालेले काही चित्रपट



स्टुडंट ऑफ द इअर हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2014 मध्ये आलियाचा हायवे हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामधील आलियाच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली.



2016 मध्ये आलियाचा उडता पंजाब हा चित्रपट रिलीज झाला. आलियासह करीना कपूर, शाहिद कपूर अशी तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 58.14 कोटींची कमाई केली.



राझी या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचं अनेक लोक आजही कौतुक करतात. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला.



गंगूबाई काठियावाडी, गली बॉय आणि डार्लिंग्स या चित्रपटांमधील आलियाच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.



काही दिवसांपूर्वी आलियाचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात आलिया आणि तिचा पती रणबीर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली.