'घाडगे अँड सून' फेम अभिनेत्री भाग्यश्री लिमयेचं वाळवंटात फोटोशूट; फोटो व्हायरल! घाडगे अँड सून फेम अभिनेत्री भाग्यश्री लिमये सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच भाग्यश्रीने फोटोशूट केलं असून तिने आपले क्लासी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. भाग्यश्रीचा हा ग्लॅमरस अंदाज हा तिच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरली आहे. भाग्यश्री मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी आयटी कंपनीमध्ये काम करत होती. 'कलर्स मराठी' वरील 'घाडगे अँड सून' या मालिकेतून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. भाग्यश्रीने वाळवंटात काढलेले हि फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. (Photo Credit : @bhagyashreelimaye/Instagram)