भगवान रामपुरे यांनी आद्य शंकराचार्यांचे 108 फूट उंच शिल्प साकारले आहे. त्यासाठी शंभर टन गन मेटल लागले आहे. शिल्पासह परिसरातील विकासाचा एकूण खर्च 2500 हजार कोटी रुपये आहे. 18 सप्टेंबरला ओंकारेश्वर येथे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते उद्घाटन झाले 15 तास मेहनत घेऊन रामपुरे यांनी शिल्पाला आकार दिला आहे. या शिल्पावर सोलापूर, मुंबई आणि कर्जत येथे काम करण्यात आले तसेच कोणत्याही शिल्पाला घडवण्यासाठी 'ओतण्याचे' विशिष्ट काम करावे लागते. ते काम चीनमध्ये करण्यात आले बोटीद्वारे ओंकारेश्वर येथे सहा-सहा फुटांचे भाग आणून लार्सन अॅड टुब्रो कंपनीच्या माध्यमातून शिल्पाची बांधणी झाली. ते काम आता जवळपास पूर्णत्वास आले आहे.