घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त झाला असला तरी डाळींच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यात. गणेशोत्सवाच्या तोंडावर मागणी वाढल्याने डाळींच्या किंमतीत 10 टक्क्यांची वाढ झालीय. तूरडाळी पाठोपाठ चणाडाळ महागलीय. दोन महिन्यांपूर्वी 100 रुपये किलो असलेली तूर डाळ तब्बल 70 रुपयांनी महाग आज रोजी तुरडाळ 170 रूपये तर चणाडाळ 80 रूपये प्रतिकिलो मिळते नवरात्रोत्सवापर्यंत मागणी आणखी वाढून दरवाढ होण्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत. उत्सवी मागणी यामुळे दरवाढ सुरू झाल परंतु केंद्र सरकारने 28 लाख टन डाळ आयातीची तयारी सुरू केली आहे. ही डाळ नाफेडमार्फत बाजारात आणली जात आहे. त्यातून दर नियंत्रणात येतील