आजपासून सुरु झालेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने झाली. आज जुन्या संसद भवनामध्ये शेवटचं कामकाज पार पडणार आहे. 75 वर्षांपासून विविध घटनांचा साक्षीदार असलेल्या संसद भवनाला निरोद देताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. पंतप्रधान मोदी यांनी जुन्या संसद भवनाच्या इमारतीतील आठवणींना उजाळा दिला पहिल्यांदा संसदेत आलो तेव्हा नतमस्तक झालो, असं यावेळी पंतप्रधान यांनी सांगितलं. जुनं संसद भवन अनेक ऐतिहासिक घटनाचा साक्षीदार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, नवीन संसद भवनात जाण्यापूर्वी देशाच्या संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासाची आठवण करुया. संसदेचे विशेष अधिवेशनात लोकसभेत पंतप्रधान मोदी म्हणतात जुन्या संसद भवनाला निरोप देताना पंतप्रधान मोदी भावूक