जगभरात महागाईही वाढता दिसत आहे. यासोबतच बेरोजगारीही वाढत आहे. कोविड महामारी आणि रशिया युक्रेन युद्धाचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे जगात महागाई आणि त्यासोबत बेरोजगारी वाढत आहे. संपूर्ण जग मंदीच्या भीतीच्या सावटाखाली जगत आहे. जागतिक मंदीच्या भीतीमुळे जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक देशांसमोर आर्थिक आव्हानंही निर्माण झाली आहेत. महासत्ता अमेरिका, युके, जर्मनी यासारख्या देशांमध्ये मंदीची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे जागतिक मंदीची भीतीही व्यक्त केली जात आहे. परिणामी जगभरात बेरोजगारीमध्येही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कंगाल झालेल्या पाकिस्तानपेक्षाही भारतात बेरोजगारी वाढली आहे. भारताचा शेजारील देश पाकिस्तानमध्ये भारतापेक्षा बेरोजगारी जास्त आहे. पाकिस्तानातील बेरोजगारीचा दर 6.3 टक्के आहे, तर भारतातील बेरोजगारीचा दर 8 टक्के आहे. पाकिस्तानपेक्षा भारतात बेरोजगारांची संख्या जास्त आहे.