भाबी जी घर पर है मधील गोरी मॅमची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली सौम्या टंडन सध्या टीव्हीपासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. टीव्हीपासून दूर राहिल्यानंतरही सौम्या टंडन चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. अलीकडेच गोरी मॅमने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये ती ट्रॅडीशल ड्रेस मध्ये दिसत आहे. सौम्या टंडन हलक्या मेकअपमध्येही या फोटोंमध्ये सुंदर दिसत आहे. चाहत्यांना अभिनेत्रीच्या फोटोंवरून नजर हटवणे कठीण आहे. सौम्या टंडनने छोट्या पडद्याशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे. शाहिद कपूर आणि करीना कपूरच्या जब वी मेटमध्ये सौम्याला चांगलीच पसंती मिळाली होती. (फोटो सौजन्य :saumyas_world_/इंस्टाग्राम)