टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता हिने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे.

आता पुन्हा तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

या फोटोंमध्ये टीना इतकी बोल्ड दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.

टीना दत्ताने तिच्या 'उत्तरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे.

आजही ती प्रत्येक घरातील इच्छा नावाने ओळखली जाते.

देशभरात तिचे लाखो चाहते आहेत. लोक तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

या नव्या फोटोशूटमध्ये टिनाने ब्लॅक ऍण्ड व्हाईट कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

लुक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेक-अप केला आहे आणि केसांचा बन बांधला आहे.

टीना बऱ्याच काळापासून कोणत्याही प्रोजेक्टचा भाग नाही.

ती शेवटची 'बिग बॉस 14' मध्ये पाहुणी म्हणून दिसली होती.