उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते. यामुळे पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग दूर होतात आणि स्किनला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनची भीती सतत असते त्यामुळे उसाचा रस प्यायल्याने डीहायड्रेशन पासून बचाव होतो. उसाचा रस ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. यात ग्लूकोजची अधिक मात्रा असून याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनवतं. उसाचा रस खोकला, दमा, मुत्ररोग आणि किडनीशी संबधित रोगांवरदेखील फायदेशीर आहे. उसाचा रस कावीळ या रोगांवर अत्यंत गुणकारी आहे. कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस नेहमी पिणे फायदेशीर आहे. उसाचा रस हा नैसर्गिक असल्यामुळे लहांनांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण पिऊ शकतात. कृत्रिम थंड पेय शरीराला तात्पुरता थंडावा देतात खरी पण याचे दुष्परिणाम खूप आहेत. याउलट उसाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.