ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, चुकीच्या वेळी याचे सेवन केल्यास शरीराचे अनेक नुकसान होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी असो किंवा त्वचेवर चमक आणण्यासाठी ग्रीन टी प्रत्येक लहान समस्या दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. मात्र, जर तुम्ही चुकीच्या वेळी ग्रीन टीचे सेवन केले तर त्यामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. जेवणाच्या 1 तास आधी ग्रीन टी घेतल्याने शरीराला खूप फायदे मिळतात. ग्रीन टीमध्ये टॅनिन असते, त्यामुळे जेवल्यानंतर लगेच त्याचे सेवन केल्याने तुमचे पचन बिघडू शकते. रिकाम्या पोटी कधीही ग्रीन टी पिण्याचा प्रयत्न करा. नेहमी सोबत काहीतरी घ्या. तुम्हाला जर ग्रीन टी पिणे आवडत असेल तर संपूर्ण दिवसात तीन कपपेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नका. ग्रीन टीमध्ये असलेले पॉलीफेनॉल कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.