काजू हे सुक्यामेव्यातील एक महत्त्वाचे फळ आहे.



काजूगरात अनेक उपयुक्त व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट आणि खनिजतत्वे असतात.



काजूमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.



काजूमध्ये तांबे मुबलक प्रमाणात असल्याने रक्तातील अशुद्धी दूर होण्यास, रक्तवाहिन्याचे कार्य सुधारण्यास मदत होते.



काजूमध्ये असणाऱ्या Proanthocyanidine अँटी-ऑक्सिडंट आणि तांबे यासारख्या घटकांमुळे कॅन्सरपासून दूर राहण्यास मदत होते.



काजू खाल्ल्यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी होण्यास मदत होते.



काजूमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशिअम आणि तांबे हे घटक असतात. त्यामुळे हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते.



काजू नियमित खाण्यामुळे केस आणि त्वचा यांचे आरोग्य सुधारते. त्वचा आणि केसांसाठी काजू खाणे उपयुक्त असतात.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.