दालचिनी तुमच्या पाठदुखीच्या त्रासावर नक्कीच आराम मिळवून देऊ शकते.



स्वयंपाकघरातील दालचिनी ही फक्त चवदारच नसते तर आजारांवरही ती फार उपयुक्त आहे.



दालचिनीमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त यांसारख्या अनेक घटकांसह सिनामल्डिहाइड आणि सिनामिक ऍसिडसारखे अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत.



जे शरीरातील खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यात मदत करतात. यामुळेच सांधेदुखी, आणि पाठदुखीमध्ये आराम मिळतो.



पाठदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी एक चमचा मधात दोन ग्रॅम दालचिनी पावडर टाकून खावे.



दिवसातून दोनदा ही रेसिपी फॉलो करा. तुम्हाला पाठदुखीपासून लगेच आराम मिळेल.



एका पातेल्यात पाणी टाकून त्यात दालचिनीचे तुकडे किंवा थोडी पावडर टाकून थोडा वेळ उकळवा.



नंतर एका कपमध्ये गाळून त्यात मध मिसळून गरमागरम प्या.