शिमला मिरचीचा वापर अनेक पदार्थांत केला जातो. काहींना शिमला मिरची आवडते तर काहींना आवडत नाही. मात्र, याचे फायदे अनेक आहेत. कॅलरी, पाणी, प्रथिने, कार्ब्स, साखर, फायबर आणि फॅट यांसारखे पोषक तत्व शिमला मिरचीमध्ये आढळतात. जे केस आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. शिमला मिरचीच्या बियांमध्ये सायटोकेमिकल्स आणि फ्लेव्हॉइड्स आढळतात, जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करतात. शिमला मिरचीच्या बियांचे सेवन केल्याने वजनही कमी होते. कारण त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. शिमला मिरची पोटाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. जे लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनी शिमला मिरची खाल्ल्यास साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.