शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्, फायबर, वनस्पती प्रथिने यांसारखे पोषक घटक असतात, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतात.



उच्च रक्तदाब हे हृदयविकाराचे कारण असू शकते. अशा स्थितीत शेंगदाण्याचे सेवन केल्यास रक्तदाब कमी होऊन हृदयविकाराचा धोका कमी होतो.



अल्झायमर हा मेंदूशी संबंधित आजार आहे, ज्याचा स्मरणशक्तीवर परिणाम होतो.



अशा परिस्थितीत नियासिन आणि व्हिटॅमिन-ई युक्त शेंगदाण्यांचे सेवन केल्यास या आजारापासून बचाव होऊ शकतो.



शेंगदाण्यामध्ये आढळणारे हे दोन्ही घटक वयोमानानुसार स्मरणशक्तीवर होणारा परिणाम आणि अल्झायमर रोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात.



शेंगदाण्यामध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करू शकतात.



शेंगदाणे प्रजनन क्षमता वाढवण्यास देखील फायदेशीर आहेत. विशेषत: ज्या महिलांना गर्भधारणेस त्रास होत आहे, त्यांनी शेंगदाण्यांचे सेवन करणे आवश्यक आहे.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.