नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूनं या चित्रपटाचं कौतुक केलं.



तापसीनं सांगितलं, 'मला आठवतं की, मी एका चित्रपट निर्मात्याला मेसेज केला होता. मी त्यांना सांगितलं होतं की, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुमचा चित्रपट खूप चांगला आहे.'



'चित्रपट चांगला असेल तर लोक चित्रपट नक्कीच पाहतात. कमी बजेट असणारा चित्रपट जर लोकांना आकर्षित करू शकतो तर तो चित्रपट खराब असू शकत नाही.'असं तापसी म्हणाली



'प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. हा एक चांगला चित्रपट आहे त्यामुळे त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ' तापसीनं सांगितलं.



पुढे ती म्हणाली, 'हा चित्रपट लोकांमध्ये एक इमोशन निर्माण करतो.'



तापसीनं पुढे सांगितलं, 'या चित्रपटासोबत जोडले जातात आणि त्यांना हा सिनेमा कळतो'



'प्रत्येकाची आवड वेगळी असते. असा कोणताच चित्रपट नाहिये, ज्यामध्ये 100 पैकी 100 प्रेक्षकांची पसंती मिळते. ', असही ती म्हणाली.



तापसी तिची मतं सोशल मीडियावर व्यक्त करत असते.



अनेक वेळा तापसीच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा होत असते.