आरबीआयकडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ, रेपो दर 4.9 टक्क्यांवर आरबीआयकडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ, रेपो दर 4.9 टक्क्यांवर कोरोना महासाथ पूर्वीच्या काळापेक्षाही रेपो दर कमी असल्याचे आरबीआयचे प्रतिपादन सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात महागाई दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज, याआधी 5.7 टक्के इतका वर्तवला होता अंदाज आर्थिक वर्ष 2022-23 साठी आर्थिक वाढीचा दर 7.2 टक्के राहण्याचा आरबीआयचा अंदाज सिमेंट, स्टीलच्या मागणीत मोठी वाढ, रेल्वे मालवाहतुकीतही वाढ जागतिक पातळीवर तणावाची स्थिती असल्याने देशातील महागाईवरही याचा परिणाम यंदाच्या आर्थिक वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला आहे. एप्रिल-मे महिन्यात 2.5 टक्क्यांची घसरण परकीय गंगाजळ 600 अब्ज डॉलरहून अधिक यंदा मान्सून सामान्य असल्याने ग्रामीण अर्थकारण चांगले राहण्याचा अंदाज क्रेडिट कार्डला यूपीआयला जोडले जाणार. पहिल्यांदा रुपे क्रेडिट कार्ड जोडले जाणार ग्रामीण सहकारी बँकांना रिअल इस्टेट क्षेत्राला कर्ज देण्याची परवानगी शहरी सहकारी बँकांना घरपोच बँकिंग सेवा देण्यास परवानगी E-Mandate साठीची मर्यादा 15 हजार रुपयांवर, याआधी ही मर्यादा 5 हजार रुपये होती