भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 सामन्यात काही खेळाडूंवर विशेष लक्ष असेल.



यातील पहिलं नाव म्हणजे आयपीएल गाजवलेला उमरान मलिक.



भारताचा आणखी एक युवा खेळाडू ज्याच्याकडे अनेकांचे लक्ष असेल तो म्हणजे सलामीवीर ऋतुराज गायकवाड.



आयपीएल 2021 मध्ये तुफान फलंदाजीनंतर आता भारतासाठी ऋतु काय करतो पाहावं लागेल.



आणखी एक युवा गोलंदाज अर्थात अर्शदीप सिंहला देखील भारतीय संघाचं तिकीट मिळालं आहे.



डेथ ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंहला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळेल का?



हार्दिकच्या नेतृत्तवाखालीच गुजरात टायटन्सने आयपीएल जिंकल्यावर आता त्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळालं आहे.



हार्दिकचा फॉर्म चांगला असेल का? तो गोलंदाजीतही कमाल करेल का? अशा साऱ्या गोष्टींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.



आरसीबीसाठी अगदी तुफान फटकेबाजी करत फिनिशर म्हणून नावारुपाला आलेल्या दिनेश कार्तिककडेही अनेकांचं लक्ष आहे.



त्याने आयपीएलमध्ये तर 16 सामन्यात 183.33 स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या.