हिना खान अशा सुंदरींपैकी एक आहे, जी तिच्या लूक आणि फॅशन सेन्ससाठी चर्चेत असते. अभिनेत्रीच्या या स्टाईलचे लाखो लोक दिवाने आहेत.
हिना खानने तिच्या किलर स्टाईलने लोकांची मने जिंकली आहेत.
हिना तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
आता पुन्हा एकदा हिना खानच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
या फोटोंमध्ये हिना खान खूपच बोल्ड दिसत आहे.
हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
यासोबत हिना खानने सिल्व्हर कलरचे, डायमंड दागिने परिधान केले आहेत. तिचा हा लूक पूर्ण करण्यासाठी हिनाने न्यूड मेकअप केला आहे आणि केसांचा मेसी बन बनवला आहे.
या फोटोंमध्ये हिनाने अनेक वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. हिनाने तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.
आता हिनाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
हिनाच्या या फोटोंना काही तासांत लाखो लाईक्स आले आहेत. त्याचबरोबर चाहत्यांनी कमेंट करताना हिनाचे कौतुक केले आहे.