अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड, लिग्नॅन्स, प्रोटीन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फेरुलिक अॅसिड, कॉपर, मोलिब्डेनम आणि फायबर आढळतात, जे अनेक आजारांवर फायदेशीर ठरतात.



ओमेगा 3 फॅटी अॅसिड डोळ्यांच्या रेटिनासाठी फायदेशीर आहे.



अळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे भूक कमी होते. त्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होते.



एका संशोधनात असे दिसून आले आहे की फ्लेक्ससीडमध्ये अँटी-फायटोकेमिकल गुणधर्म आढळतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढत नाही.



अळशीमुळे पचनशक्ती चांगली, सुरळित राहते. शरीराला उर्जा मिळते. अळशीमध्ये फायबर असतं, जे पचनशक्ती सुधारतं.



अळशीच्या सेवनाने महिलांचा मासिक पाळीचा त्रासही कमी होण्यास मदत होते.



दररोज अळशी खाल्ल्याने संधीवात, सांधेदुखीमध्येही आराम पडतो. हाडं मजबूत होण्यास मदत होते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.