तिखट स्वाद असणार्या काळीमिरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
जेवणाचा स्वाद वाढविण्या सोबतच काळीमिरी ही भूक वाढवण्याचे देखील कार्य करते.
काळीमिरी पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड चा स्त्राव वाढवते. यामुळे व्यक्तीची पचनशक्ती वाढते.
पचनशक्ती सुधारण्यासोबतच काळीमिरी पोटातील सूजन, पोट फुगणे, अपचन, पोटात गॅस तयार होणे आणि बद्धकोष्टता च्या समस्येपासून मुक्ती देते.
सर्दी खोकला ची समस्या असल्यास काळीमिरीचे 2 ग्राम चूर्ण गरम दूध सोबत प्यावे. यासोबत काळी मिरीचे 7 दाणे गिळून घ्यावेत. असे केल्याने सर्दी खोकला कमी होतो.
ताप येत असल्यास एक चमचा काळी मिरी पावडरमध्ये अर्धा लिटर पाणी आणि 2 चमचे मिश्री टाकून चांगले उकळावे. यानंतर हा काढा सकाळ संध्याकाळी प्यावा.
जर सारखी डोकेदुखी सुरू असेल तर गॅसवर तवा गरम करावा आणि गरम तव्यावर 2 ते 3 काळीमिरीचे दाणे टाकावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.