इतर गोष्टींच्या तुलनेत वाटाण्यामध्ये कमी ग्लाइसेमिक इंडेक्स असतो. वाटाण्यामध्ये फायबर आणि पोषण तत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास देखील वाटाणे फायदेशीर ठरतात. वाटाण्यामध्ये त्वचेसाठी देखील आवश्यक पोषण तत्त्वे असतात. यामध्ये बी 6 आणि क जीवनसत्त्वे असतात. वाटाण्यामुळे पोट साफ होण्यास देखील मदत होऊ शकते. शरीरासाठी चांगला असणाऱ्या कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढवण्यास वाटाण्यामुळे मदत होते. संधिवातासाठी वाटाणा फायदेशीर ठरु शकतो. वजन कमी करण्यासाठी देखील वाटाण्याचा उपयोग होऊ शकतो.