कढीपत्त्याच्या पानांमध्ये भरपूर पोषण तत्त्वे असतात.



याचा वापर लोकं भाज्यांमध्ये आणि फोडणी देण्यासाठी प्रामुख्याने करतात.



कढी पत्त्याच्या पानांचा सुगंध हा फार चांगला असतो.



चवीसाठी देखील कढीपत्ता कमालीचा फायदेशीर असतो.



याशिवाय कढीपत्त्याची पानं टाकलेलं पाणी उकळून प्यायल्याने देखील अनेक फायदे मिळण्यास मदत होते.



कढीपत्त्याच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात एँटिऑक्सीडेंट्स देखील आढळतात.



हे पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली होण्यास मदत होते.



कढी पत्त्याच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात लोह असते.



त्यामुळे याचे पाणी प्यायल्याने रक्तवाढीस देखील फायदा होऊ शकतो.



आरोग्यासाठी हे पाणी अत्यंत फायदेशीर ठरु शकते.