बऱ्याच लोकांना सकाळी गरम पाणी पिण्याची सवय असते. पण जर तुम्ही कोमट पाण्यात हळद टाकून ते पाणी प्यायले तर तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. हळदी पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. तसेच तुमची रोग प्रतिकारक शक्ती देखील चांगली होऊ शकते. तुमचे वजन कमी करण्यास देखील हळदीचे पाणी मदत करु शकते. कर्करोगासाठी हळद पाणी फायदेशीर ठरु शकते. त्वचेसाठी देखील हळद पाणी फायदेशीर ठरु शकते. तसेच तुमच्या हाडांसाठी देखील हळद पाणी उपयुक्त ठरु शकते. किडन्यांचे स्वास्थ्य देखील चांगले ठेवण्यास हळद पाणी मदत करते. हळद पाण्यामध्ये लिंबू आणि एक चमचा मध घालून देखील तुम्ही ते पाणी पिऊ शकता.